मुखपृष्ठआमच्याबद्दल
मेनू

आमच्याबद्दल

हिरो मोटोकॉर्प लि. (पूर्वीचे हिरो होंडा मोटर्स लि.) हे भारतामध्ये स्थित, जगातील सर्वात मोठे दुचाकीचे उत्पादक आहेत.

2001 मध्ये, कंपनीने भारतातील सर्वात मोठी दुचाकी उत्पादक कंपनी तसेच एका कॅलेंडर वर्षातील युनिट व्हॉल्युम विक्रीमधील 'जगातील क्र.1' ची कंपनी म्हणून प्रतिष्ठित स्थान पटकावलेले आहे. हिरो मोटोकॉर्प लि. ने आजपर्यंत हे स्थान अढळ ठेवलेले आहे.

व्हिजन

एका साध्या व्हिजनने हिरो होंडाची कथा सुरू झाली - एका अशा गतीमान आणि सामर्थ्यवान भारताचे स्वप्न, ज्याला त्याच्या दुचाकीचे बळ मिळालेले असेल. हिरो मोटोकॉर्प लि., कंपनीच्या पाऊलखुणा जागतिक रिंगणामध्ये विस्तारण्याच्या नवीन फोकससह जागतिक दर्जाचे गतीचे उपाय देण्याची वचनबध्दता कंपनीच्या नवीन ओळखीमध्ये प्रतिबिंबित होते.

मिशन

हिरो मोटोकॉर्पचे मिशन एक जागतिक उद्योग बनण्याचे आहे. एक असा उद्योग जो त्याच्या ग्राहकांच्या गरजा आणि महत्वाकांक्षांची पूर्तता करेल, तंत्रज्ञान, स्टाईल आणि गुणवत्तेमध्ये नवे मापदंड निर्माण करेल, ज्यामुळे त्याचे ग्राहकच त्याचे ब्रँड अॅडव्होकेट्स बनतील. आपल्या लोकांना त्यांच्या क्षमतेचा पुरेपूर वापर करता यावा यासाठी कंपनी त्यांना सहभागी करून घेणारे वातावरण प्रदान करेल. ती मूल्य निर्मितीवर लक्ष केंद्रित करेल आणि आपल्या भागीदारांसह संबंध मजबूत करेल.

गाभा मूल्ये

सचोटी

नैतिक आणि सदाचरणाच्या तत्त्वांचे पालन

नम्रता

उद्धटपणा नसणे, नवीन कल्पना अंगिकारण्याबाबत खुले विचार, कल्पकता आणि शिकणे

सांघिक कार्यातून उत्कृष्ठता

चिकाटी आणि आपल्या सर्व कृती, उत्पादने आणि सेवांमध्ये अचूकता आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणे

वेग

आपल्या सर्व कृतींतून प्रतिसाद देणे; धोरण आखणी व अंमलबजावणी करण्याची क्षमता

सन्मान

वरिष्ठ, वृद्ध; भौतिक, आध्यात्मिक आणि बौद्धिक जगामध्ये सर्व पात्र गोष्टी; यंत्रणा, प्रक्रिया आणि मूल्ये यांबाबत

धोरण

सर्व श्रेणींमध्ये एक भक्कम उत्पादन पोर्टफोलिओ तयार करणे, जगभरामध्ये विकासाच्या संधी पडताळून पाहणे, आपल्या चालनात्मक कार्यक्षमता सातत्याने सुधारणे, ग्राहकांपर्यंतची पोहोच आक्रमकपणे विस्तारणे, ब्रँड बांधणीच्या उपक्रमांमध्ये गुंतवणूक करीत राहणे आणि ग्राहक व भागधारकांना आनंद मिळेल याची खात्री करणे ही हिरो मोटोकॉर्पची मुख्य धोरणे आहेत.

ब्रँड

नवीन हिरो उदयाला येत आहे आणि जागतिक रिंगणामध्ये चमकण्याचा आत्मविश्वास आहे. कंपनीची नवीन ओळख "हिरो मोटोकॉर्प लि." ही खरोखरच तिचे गतीशीलता आणि तंत्रज्ञानावर केंद्रित केलेले लक्ष बळकट करण्याचे आणि जागतिक पाऊलखुणा निर्माण करण्याचे व्हिजन प्रतिबिंबित करणारी आहे. नवीन ब्रँडची ओळख निर्माण करणे आणि तिला चालना देणे हे सर्व उपक्रमांच्या केंद्रस्थानी असेल, यासाठी सर्व संधी वापरल्या जातील आणि क्रिडा, मनोरंजन आणि अगदी खालच्या पातळीपर्यंत सक्रियणामध्ये भक्कम उपस्थितीची तरतूद केली जाईल.

उत्पादक

हिरो मोटोकॉर्प दुचाकींची निर्मिती 4 जागतिक स्तरावरील मापदंड असलेल्या उत्पादक सुविधांमध्ये केली जाते. यांपैकी दोन उत्तरी भारतातील हरियाणा राज्यातील गुडगाव आणि धारूहेरामध्ये स्थित आहेत. तिसरा उत्पादक प्रकल्प उत्तराखंड या डोंगराळ राज्यातील हरिद्वार येथे आहे; अगदी अलीकडील अत्याधुनिक प्रकल्प राजस्थानातील नीम्राणा येथे उभारलेली हिरो गार्डन फॅक्टरी आहे.

वितरण

भारतातील दुचाकी बाजारपेठेमध्ये होत असलेली कंपनीची वाढ हा नवीन भौगोलिक क्षेत्रांमध्ये आणि वाढीच्या बाजारपेठांमध्ये पोहोचण्याच्या आंतरिक क्षमतेचा परिणाम आहे. हिरो मोटोकॉर्पचे व्यापक विक्री व सेवेचे जाळे आता 6000 कस्टमर टच पॉईंट्सपर्यंत विस्तारले आहे. यामध्ये देशभरातील अधिकृत वितरक, सर्व्हिस आणि स्पेअर पार्ट्सची दुकाने आणि वितरकांनी नियुक्त केलेली दुकाने यांचा समावेश होतो.

  • फसवणुकीपासून सावध राहा
  • फसवणूक आणि घोटाळ्यांच्या जाळ्यात अडकू नका
  • अधिक वाचा