मुखपृष्ठ हिरो अस्सल पार्ट्स
मेनू

हिरो अस्सल पार्ट्स

आमच्या ग्राहकांचा एक आनंददायक प्रवास आणि ग्राहकाचे 100% समाधान हा हिरो मोटोकॉर्पच्या व्यवसाय धोरणाचा गाभा आहे, हिरो मोटोकॉर्प लि. चे एक समर्पित व्यावसायिक युनिट आहे जे आमच्या ग्राहकांच्या अस्सल पार्ट्सची

- एचजीपी म्हणून लोकप्रिय असलेले हिरो अस्सल पार्ट्स विकण्यासाठीच आहे. नवीन तुम्ही आता हीरो जेन्युइन पार्ट्‌स थेट आमच्या नव्याने सुरु केलेल्या पोर्टलवरून खरेदी करू शकता.

व्हिजन : "कोणत्याही ग्राहकाला हवा असलेला पार्ट मिळवण्यासाठी वाट पाहावी लागू नये"

आमच्या ग्राहकांना एक अखंड आनंददायक अनुभव देणे हे हिरो मोटोकॉर्पच्या सातत्यपूर्ण फोकसचे वैशिष्ट्य आहे, ज्यातून आम्हाला आमची पोहोच वाढवायची आहे, उद्योगामध्ये काही मापदंड निर्माण करायचे आहेत आणि कमी खर्चात मालकी मिळेल याची खात्री करायची आहे.

आमची पोहोच वाढविणे

हिरो मोटोकॉर्पमध्ये, आम्ही एक प्रभावी पर्यावरणपूरक प्रणाली निर्माण करतो आहोत ज्यामुळे बहुस्तरीय भारतीय बाजारपेठेमध्ये आमचे अस्तित्व सर्वात व्यापक आणि सखोल निर्माण होईल. ग्राहकांच्या सातत्याने विकसित होणाऱ्या महत्वाकांक्षांची पूर्तता करण्यासाठी, बदलत्या परिस्थितींना प्रतिसाद देता यावा यासाठी आम्ही ग्राहक टच पॉईंट्सचे संपूर्ण जाळे सातत्याने बळकट करत आहोत. संपूर्ण भारतातील 95 पार्ट्स वितरक, 800 अधिकृत वितरक आणि 1300 अधिकृत सर्व्हिस सेंटर्स आणि जगभरातील 35 देशांमध्ये 6000 + टच पॉईंट्सद्वारे एचजीपीचे वितरण केले जाते. तुमच्या सर्वात जवळचा टच पॉईंट शोधण्यासाठी येथे क्लिक करा. ग्राहकांना सातत्याने सेवा देण्याच्या आमच्या पॅशनमध्ये तुम्हालाही सहभागी व्हायचे आहे असे वाटत असेल तर, पार्ट्स वितरक बनण्यासाठी येथे अर्ज करा आणि हिरो मोटोकॉर्प कुटुंबाचा एक भाग बना.

उद्योगाचे मापदंड निश्चित करणे

हिरो अस्सल पार्ट्स हेच केवळ तुमच्या हिरो दुचाकीसाठीचे प्रमाणित पार्ट्स आहेत. तुम्हाला वाढीव आणि अतुलनीय कामगिरी देण्यासाठी तुमच्या बाईकला चपखल बसतील अशा अचूकतेने ते तयार केलेले आहेत. प्रत्येक पार्ट हिरो अस्सल पार्ट बनण्यापूर्वी गुंतागुंतीच्या गुणवत्ता तपासणी बिंदूंच्या कडक चाचणीतून जातो. हे पार्ट्सही आता नीम्राणामध्ये ग्लोबल पार्ट्स सेंटर (जीपीसी) द्वारे पुरवले जातात.

जीपीसीमधून भविष्यातील शक्यता प्रदर्शित होतात. उत्कृष्ठ उत्पादन सुविधा आणि अत्याधुनिक यंत्रणा यांच्या मिश्रणाने पुरवठा साखळीच्या प्रक्रिया तर सुलभ होतातच परंतु त्याचबरोबर कामाचे प्रसन्न, आरोग्यदायी आणि सुंदर वातावरण मिळते. हिरो गार्डन फॅक्टरी इतकेच भव्य, 35 एकरवर पसरलेले जीपीसी हे भारतातील राजस्थान राज्यामध्ये हिरो निम्राणा संकुलाचा महत्त्वाचा भाग आहे. कमीतकमी मानवी हस्तक्षेप होईल आणि उत्पादनक्षमता ठळकपणे वाढेल अशाप्रकारे लीन उत्पादन प्रणालींवर आधारित जीपीसीची रचना केलेली आहे. ऑटो क्षेत्रातील हे नवीन तांत्रिक आश्चर्य म्हणजे औद्योगिक मापदंड आहे. हे ऑटोमेटेड स्टोअरेज आणि रिट्रायव्हल सिस्टिम्स (एएसआरएस) ने ते सुसज्ज आहे आणि सानुकूल आणि वैशिष्ट्यपूर्ण वेअरहाउस मॅनेजमेंटद्वारे प्रणालीद्वारे पार्ट्सच्या ऑन-लाइन ट्रॅकिंगने नियंत्रित युनि शटल आणि रेल गाइटेड मटेरियल मूव्हमेंट यांसारख्या नवीन युगाच्या इतर संकल्पनांसह यामध्ये ऑटोमेटेड पॅकेजिंग आणि सॉर्टिंग सिस्टीम आहे. हरित इमारत संकल्पनेचे अनुसरण करून, इंडियन ग्रीन बिल्डिंग काउन्सिल (आयजीबीसी) ने गार्डन फॅक्टरीला प्लॅटिनम श्रेणी उत्पादन सुविधा म्हणून मान्यता दिली आहे.

कमी खर्चात मालकी

हिरो मोटोकॉर्प आपल्या उत्पादने, पार्ट्स आणि सेवांतून ग्राहकांचा अनुभव वाढविण्यासच वचनबद्ध नाही तर, दुचाकीच्या मालकीचा एकूण खर्च कमी करण्यावर देखील केंद्रित आहे. अशाप्रकारे या उद्योगामध्ये उत्पादन संपादन, बसवणे, वापरणे, त्याची देखभाल आणि ते बदलणे याचा समावेश होतो. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, आपली सर्वोच्च मानके असूनही संपूर्ण एचजीपी पोर्टफोलिओमध्ये ग्राहकांसाठी पार्ट्स बदलण्याचा खर्च परवडणाऱ्या दरांमध्ये ठेवलेला आहे.

  • फसवणुकीपासून सावध राहा
  • फसवणूक आणि घोटाळ्यांच्या जाळ्यात अडकू नका
  • अधिक वाचा