मेन्यू

जेन्युईन स्पेअर पार्ट्स FAQs

स्पार्क प्लग घासल्या गेल्यास काय होईल?

 स्पार्क प्लग हा इग्निशन सिस्टीममधील आवश्यक घटकांपैकी एक आहे. ज्वलनामुळे उच्च व्होल्टेज आणि कोरोसिव्ह ऑक्सिडायझेशनच्या पुनरावृत्त स्त्रावामुळे स्पार्क प्लग घासल्या जातो, ज्यामुळे प्लगमधील गॅप हळूहळू वाढत जाते.
सामान्यत: प्रत्येक 12000 किमीनंतर एकदा स्पार्क प्लग बदलण्याची शिफारस केली जाते, कारण तोपर्यंत तो घासला गेलेला असतो. अशा स्पार्क प्लगचा दीर्घकाळ वापर करण्यामुळे सुरू होण्यास समस्या, मिसफायरिंग, सामर्थ्य कमी होणे आणि फ्यूएलचा जास्त वापर आणि उत्सर्जन वाढणे या समस्या उत्पन्न होतात. गंभीर प्रकरणांमध्ये, आपल्याला कदाचित ते बदलले जाण्याची प्रतीक्षा करावी लागू शकते.
HGP स्पार्क प्लग हे खासकरून तुमच्या हिरो वाहनासाठी डिझाईन केलेले आहेत जेणेकरून दीर्घकाळ समस्या मुक्त राईड सुनिश्चित होईल. अधिक मदतीसाठी, कृपया तुमच्या नजीकच्या अधिकृत वर्कशॉपला भेट द्या.

मी एअर फिल्टर कधी बदलणे आवश्यक आहे?

 एअर फिल्टर इंजिनच्या भागांचे संरक्षण करण्यासाठी येणाऱ्या हवेतील कण आणि धूळ फिल्टर करते. सामान्यत: दीर्घकाळ वापरल्यानंतर कालांतराने ते कण आणि धुळीमुळे बंद होते.
हिरो मोटोकॉर्प वाहनांमध्ये मूलत: तीन भिन्न प्रकारचे एअर फिल्टर आहेत, ते पॉलियुरेथीन वेट प्रकार, ड्राय पेपर आणि व्हिस्कस पेपर प्रकार आहेत. पॉलियुरेथीन आणि ड्राय पेपर फिल्टरसाठी नियमितपणे स्वच्छता करणे आवश्यक आहे. पॉलीयुरेथीनला एकदा नुकसान झाल्यानंतर बदलणे आवश्यक आहे तर जेथे ड्राय पेपर फिल्टरला प्रत्येक 12000 km नंतर एकदा बदलणे आवश्यक आहे. व्हिस्कस प्रकाराला स्वच्छता करण्याची आवश्यकता नाही आणि प्रत्येक 15000 km नंतर एकदा बदलण्याची शिफारस केली जाते. धुळीच्या वातावरणात वापरल्यावर अधिक वारंवार स्वच्छता करणे किंवा लवकर बदलणे आवश्यक असू शकते.
जर शिफारस केलेल्या वेळापत्रकाचे अनुसरण केले नाही तर त्यामुळे इंजिनच्या शक्तीचा अभाव, फ्यूएल कार्यक्षमता कमी होणे आणि इंजिन लवकर बिघडून खर्चिक दुरुस्ती करावी लागू शकते.
अप्रमाणित एअर फिल्टर वापरल्याने फिल्टर क्षमता प्रभावित होऊ शकते. खुल्या बाजारात अनेक HGP सारखे फिल्टर उपलब्ध आहेत, ज्यांची गुणवत्ता कमी आहे. असे फिल्टर सामान्य वापरातच कमकुवत होतात ज्यामुळे त्यांचे आकुंचन होऊन सीलिंग क्षमता कमी होते. इंजिन कामगिरी आणि जीवन वाढविण्यासाठी फक्त जेन्युईन HGP एअर फिल्टरचाच वापर करा. अधिक मदतीसाठी, कृपया तुमच्या नजीकच्या अधिकृत वर्कशॉपला भेट द्या.

मी फ्यूएल ट्यूब कधी बदलणे आवश्यक आहे?

 फ्यूएल ट्यूब एक जॉईंट आहे ज्याद्वारे फ्यूएल टँकपासून कार्ब्युरेटरपर्यंत फ्यूएल निरंतर प्रवाहित होते.
सामान्यपणे फ्यूएल ट्यूब बदलण्यासाठी 4 वर्ष हा शिफारस केलेला सरासरी कालावधी आहे. 6 महिने किंवा त्यापेक्षा जास्त काळ न वापरलेल्या वाहनासाठी अपवादात्मक प्रकरणांमध्ये फ्यूएल होज बदलणे आवश्यक आहे.
पेट्रोलच्या अंतर्गत अतिशय अस्थिरतेमुळे फ्यूएलचा सतत प्रवाह फ्यूएल ट्यूबला कमकुवत बनवतो आणि ते फ्यूएल ट्यूबच्या जॉईंटमधून गळायला लागते जे फ्यूएलच्या वासाने ओळखू येते.
HGP चे फ्यूएल होज विविध पदार्थांच्या स्तरांपासून बनवलेले आहे, जे आतून फ्यूएल मुळे कमकुवत होणे थांबवते आणि बाहेरून वेगवेगळ्या वातावरणाच्या स्थितींचा सामना करीत टिकून राहते. फ्यूएल ट्यूबची दोन्ही टोके वायर क्लिपने जोडण्याची शिफारस केली आहे.
अधिक मदतीसाठी, कृपया तुमच्या नजीकच्या अधिकृत वर्कशॉपला भेट द्या.

जर मी इंजिन ऑईल बदलले नाही तर काय होईल?

 इंजिन ऑईलच्या सततच्या वापरामुळे त्याची 'लुब्रिकेट' आणि 'स्वच्छ' करण्याची क्षमता खूपच कमी होते, ज्यामुळे इंजिनचे कार्य सामान्य राहणे अशक्य बनते.
सामान्यपणे, इंजिन ऑईल प्रत्येक 6000 kms नंतर बदलले पाहिजे आणि प्रत्येक 3000 kms वर टॉप-अप केले पाहिजे.
जर वरील वेळापत्रकाचे अनुसरण केले नाही तर इंजिनची कामगिरी घसरू शकते आणि फ्यूएलची गरज वाढू शकते जे इंजिनचे अतिशय तापणे आणि आवाजाची पातळी वाढल्याने दिसून येते. गंभीर प्रकरणांमध्ये, अखेरीस इंजिन पूर्णपणे बिघडू शकते ज्यामुळे खर्चिक आणि दीर्घकाळ चालणारी दुरूस्ती करण्याची वेळ येऊ शकते.
HGP ने शिफारस केलेल्या 10W30 SJ JASO MA इंजिन ऑईलची उत्कृष्ट वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत:-
• कार्यक्षम लुब्रिकेटिंग, क्लीनिंग, कूलिंग आणि सीलिंग क्षमता.
• थंडीत स्टार्टिंगची उत्तम क्षमता
• वाढीव ड्रेन कालावधी
• पर्यावरण पूरक
अधिक मदतीसाठी, कृपया तुमच्या नजीकच्या अधिकृत वर्कशॉपला भेट द्या.

मी केवळ HGP ने शिफारस केलेल्या इंजिन ऑईलचा आग्रह का करावा?

 खुल्या बाजारात 10W30 च्या विविध श्रेणी उपलब्ध आहेत. 10W30 SJ JASO MA श्रेणीच्या इंजिन ऑईलची विशेषता पुढीलप्रमाणे आहे:-
• कार्यक्षम लुब्रिकेटिंग, क्लीनिंग, कूलिंग आणि सीलिंग क्षमता.
• थंडीत स्टार्टिंगची उत्तम क्षमता
• वाढीव ड्रेन कालावधी
• पर्यावरण पूरक
अधिक मदतीसाठी, कृपया तुमच्या नजीकच्या अधिकृत वर्कशॉपला भेट द्या.

जर मी शिफारस केलेल्या अंतराने ड्राइव्ह चेनची सर्व्हिसिंग करून घेतली नाही तर काय?

 ड्राईव्ह चेनचे आयुष्य योग्य ल्युब्रिकेशन आणि समायोजनावर अवलंबून असते. जर तसे झाले नाही तर ती लवकर घासली जाईल. घासलेले स्प्रॉकेट्स ड्राईव्ह चेनला फाडतील ज्यामुळे वाहनाची कामगिरी प्रभावित होईल. मोटरसायकल खडखड करीत धावणे आणि चेनचा आवाज येणे हे चेन स्प्रॉकेट किट बदलण्याचे सूचक आहेत.
जर अतिशय घासलेली असेल तर ड्राईव्ह चेन चालतांना हेलकावे घेऊ शकते, स्प्रॉकेटवरून निघू शकते आणि घटकांना हानी पोहचवू शकते ज्यामुळे चालकाच्या सुरक्षेला धोका उत्पन्न होऊ शकतो. यामुळे फ्यूएल कार्यक्षमता घसरू शकते आणि चलनक्षमतेवर परिणाम होऊ शकतो.
HGP च्या चेन स्प्रॉकेट किट उत्तम दर्जाच्या बनलेल्या आहे आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या कामगिरीसाठी योग्य टेस्ट केलेल्या आहेत.
अधिक मदतीसाठी, कृपया तुमच्या नजीकच्या अधिकृत वर्कशॉपला भेट द्या.

मी माझ्या स्कूटरचा ड्राईव्ह बेल्ट कधी बदलावा?

 ड्राईव्ह बेल्टचा संबंध नेहमी पुलीशी येतो त्यामुळे कालांतराने तो घासला गेल्यावर बदलणे आवश्यक असते. तसेच तो रबरपासून बनलेला असल्याने ओझोन आणि उष्णतेमुळे कठीण बनतो आणि कमकुवत होत जातो.
ड्राईव्ह बेल्टची शिफारस केलेली बदली वेळ प्रत्येकी 24000 kms नंतर एकदा आहे.
ड्राईव्ह बेल्ट घासल्याने किंवा कठीण बनल्याने घसरू शकते ज्यामुळे फ्यूएलची हानी होते आणि फ्यूएलचा वापर वाढू शकतो.
HGP चे ड्राईव्ह बेल्ट हे सिन्थेटिक रबरने कसलेले बेल्ट आहे ज्यात केंद्रभागी फायबर आहे, ज्यांना सुरळीत राईड आणि दीर्घकाळ सर्व्हिस पुरवण्यासाठी उच्च घर्षण, उष्णता आणि ओझोनमध्ये टिकून राहण्यास डिझाईन करण्यात आले आहे.
अधिक मदतीसाठी, कृपया तुमच्या नजीकच्या अधिकृत वर्कशॉपला भेट द्या

जर मला असामान्य स्क्वेकिंग आवाज आणि कमकुवत ब्रेकिंग कार्यक्षमतेची समस्या येत असेल तर?

सर्व्हिस लिमिट ओलांडल्यानंतर कमी घर्षणामुळे ब्रेक शूज/पॅडचा वापर ब्रेकचा प्रभावी करेल. अत्याधिक घासले गेल्याने ब्रेक शूज/पॅडचा धातूचा भाग ड्रम/डिस्कशी संपर्कात येतो आणि त्यामुळे दुरुस्तीचा खर्च वाढतो आणि महत्वाचे म्हणजे चालकाची सुरक्षाही धोक्यात येते.
ब्रेक शू, पॅड, ड्रम किंवा डिस्क बदलण्याचे सूचक म्हणजे ब्रेक लावण्यासाठी जास्त प्रयत्न करणे आणि असामान्य स्क्वेकिंग आवाज आहेत.
HGP ब्रेक शूज / पॅड / ड्रम / डिस्क यांची चालकाची सुरक्षा ध्यानात घेऊन उच्चतम दर्जाच्या पातळीपर्यंत निर्मिती केली जाते. स्वच्छ आणि सुरक्षित वातावरणासाठी शूज / पॅडवरील नॉन-ॲस्बेस्टॉस घर्षण सामग्रीचा वापर करणे यासारखी फीचर्स त्यांना तुमच्या हिरो 2 व्हीलरसाठी सर्वोत्तम निवड बनवतात.
अधिक मदतीसाठी, कृपया तुमच्या नजीकच्या अधिकृत वर्कशॉपला भेट द्या.

कॅम चेन कमकुवत झाल्यानंतर मी बदली केली नाही तर काय होईल?

अत्यंत घासलेली चेन कदाचित स्प्रॉकेटसह सातत्याने गुंतणार नाही, ज्यामुळे कॅम चेनचा आवाज येऊ शकतो आणि कामगिरी घसरू शकते. गंभीर परिस्थितीत चेन तुटूही शकते, ज्यामुळे इंजिनचे मोठे नुकसान होऊ शकते आणि चालकाची सुरक्षा धोक्यात येऊ शकते.
HGP कॅम चेन किटला इंजिनच्या ऑपरेशन दरम्यान सर्वोच्च ताण सहन करण्यास डिझाईन केलेले आहे. ते इंजिनची कार्यक्षमता देखील वाढवते. अधिक मदतीसाठी, कृपया तुमच्या नजीकच्या अधिकृत वर्कशॉपला भेट द्या.

माझ्या मोटरसायकलचा पिक-अप कमी आहे. मला क्लच फ्रिक्शन डिस्क बदलणे आवश्यक आहे का?

फ्रिक्शन डिस्क सामान्यत: त्यांच्यावर चिकटलेल्या घर्षण सामग्रीसह ॲल्युमिनियम प्लेट्सपासून बनवले जातात. ते क्लच प्लेट्ससह फ्रिक्शन फोर्सद्वारे इंजिनमधून ट्रान्समिशनपर्यंत ऊर्जा प्रसारित करतात.
CFD (क्लच फ्रिक्शन डिस्क) कालांतराने घासल्या जाते आणि जेव्हा घासणे सर्व्हिस मर्यादेपेक्षा जास्त होते तेव्हा बदलणे आवश्यक असते. प्राथमिक स्वरूपात किकने स्टार्टिंग होणाऱ्या (100CC आणि 125CC श्रेणीमधील सर्व मॉडेल्स) वाहनांची किक घसरणे हा सीएफडी घासल्याचा पहिला संकेत आहे.
CFDच्या होणाऱ्या झीजेमुळे इंजिन क्षमतेपेक्षा अधिक तापणे, उर्जेची कमतरता, फ्यूएल वापराच्या वाढीसह प्रवेगात होणारी वाढ. तसेच यामुळे अन्य पार्ट जसे की क्लच प्लेट आणि प्रेशर प्लेट यांनाही हानी पोहोचू शकते.
HGP क्लच फ्रिक्शन डिस्क या दर्जेदार गुणवत्तेच्या अ‍ॅस्बेटॉस रहित साहित्यापासून बनविलेल्या आहेत. ज्या केवळ उच्च घर्षण शक्तीपासून बचाव आणि उष्णता नष्ट करीत नसून कमी हवा प्रदूषणाची खात्री अ‍ॅस्बेटॉस रहित साहित्यामुळे मिळते. याचा परिणाम घटकांच्या आयुष्यात होणारी वाढ आणि आरोग्यास होणार्‍या कोणत्याही धोक्यास प्रतिबंधित करते.
अधिक मदतीसाठी, कृपया तुमच्या नजीकच्या अधिकृत सर्व्हिस सेंटरला भेट द्या.

वाहन चालवतांना त्रासदायक निष्क्रियता आणि वेगावर नसलेले नियंत्रण यामुळे मला काहीवेळ त्रासल्यासारखे होते? मला कोणता भाग बदलण्याची गरज आहे?

थ्रॉटल केबल आणि लिंकेज दीर्घकाळ वापरामुळे क्षीण होऊ शकतात आणि त्यांना हानी पोहोचू शकते. वातावरणाशी येणाऱ्या संपर्कामुळे गंज बसू शकतो आणि विघटनही होऊ शकतो. थ्रॉटल ऑपरेशन चिकट होऊ शकते. थ्रॉटल सोडला तरीही थ्रॉटल वॉल्व्ह उच्च गतीने इंजिन चालवताना सहजतेने परत येण्यास अपयशी ठरेल.
अनियमित निष्क्रिय इंजिनामुळे फ्यूएलचा अधिक वापर आणि इंजिन क्षमतेपेक्षा अधिक तापणे यासारखे परिणाम संभवतात. काही परिस्थितीमध्ये क्लच सोडतेवेळी वाहनावरील नियंत्रण सुटू शकते किंवा वाहन कलणे हे राईडच्या सुरक्षिततेला धोका असल्याचे निदर्शक आहे.
हिरो 2 व्हीलरसाठी मॉडेल कॉन्फिगरेशनवर आधारित HGP थ्रॉटल केबल्स विशेषत: डिझाईन केलेले आहेत. हे केबल्स सुरळीत कार्य आणि दीर्घकाळ सेवेसाठी आतून लुब्रिकेट केलेले आहेत.
अधिक मदतीसाठी, कृपया तुमच्या नजीकच्या अधिकृत वर्कशॉपला भेट द्या.
 

गिअर शिफ्ट ऑपरेशन माझे मोटरसायकल चालविणे कठीण झाले आहे. या समस्येमागे नेमके कोणते कारण असू शकते?

क्लच असेम्ब्लीज क्लच वापरण्यासाठी केबलचा वापर करतात ज्यामुळे ते लांबतात आणि लिंकेज घासू शकतात किंवा दीर्घकाळ वापरल्यानंतर क्षतिग्रस्त होऊ शकतात. जेव्हा क्लच केबल ताणली जाते, तेव्हा क्लच फ्री-प्ले वाढतो.
यामुळे क्लचचे विलग होणे पूर्ण होत नाही, स्थिर स्थितीमध्ये जेव्हा ट्रान्समिशन गिअरसोबत गुंतलेले असते तेव्हा गिअर बदलणे कठीण होते आणि क्लच ओढला जातो. काही गंभीर प्रकरणांमध्ये जर केबल जॉईंटमधून तुटली तर वाहन नियंत्रणाबाहेर जाऊ शकते चालकाची सुरक्षा धोक्यात येऊ शकते. म्हणूनच नियमित तपासणी किंवा बदलणे खूपच महत्त्वाचे आहे.
एका अप्रमाणित केबलमुळे योग्य फ्री-प्ले होत नाही आणि गिअर बदलणे कठीण होऊ शकते. म्हणूनच, HGP क्लच केबल्स हे प्रत्येक मॉडेलच्या वैशिष्ट्यांना स्वतंत्रपणे लक्षात घेऊन डिझाईन केले जातात. तसेच, HGP क्लच केबल्सना आतून लुब्रिकेट केलेले असते ज्यामुळे सुरळीत कार्य आणि दीर्घकाळ सेवा प्रदान करता येते.
अधिक मदतीसाठी, कृपया तुमच्या नजीकच्या अधिकृत वर्कशॉपला भेट द्या.

मी कमकुवत फ्यूएल स्ट्रेनर स्क्रीनच्या जागी केवळ HGP फ्यूएल स्ट्रेनर स्क्रीनच लावण्याचा आग्रह का करावा?

फ्यूएल मधील अशुद्धींमुळे फ्यूएल स्ट्रेनर स्क्रीन एकतर अवरूद्ध किंवा क्षतिग्रस्त होऊ शकते. अवरूद्ध फ्यूएल स्ट्रेनरच्या बाबतीत, कार्ब्युरेटरमध्ये फ्यूएल पातळी अपुरी आहे (विशेषत: अत्यंत वेगवान कार्यादरम्यान) आणि जिथे स्ट्रेनरचे नुकसान झाले असेल आणि अशुद्धता स्क्रीन/फिल्टर केली जात नसेल तेथे त्यामुळे कार्ब्युरेटरमध्ये जेट अवरूद्ध होऊ शकते. दोन्ही प्रकरणांमध्ये, हवा फ्यूएल प्रमाणात अंतर उत्पन्न होते ज्यामुळे मध्यम ते उच्च गतीच्या कार्यादरम्यान ऊर्जा कमी होते आणि सुरू होण्यास समस्या होऊ शकते.
HGP ची फ्यूएल स्ट्रेनर स्क्रीन कार्ब्युरेटरमध्ये आणि नंतर इंजिनमध्ये प्रवेश करणाऱ्या फ्यूएलचे उच्च फिल्टरेशन सुनिश्चित करते. अधिक मदतीसाठी, कृपया तुमच्या तुमच्या नजीकच्या अधिकृत वर्कशॉपला भेट द्या.
 

जर मी ब्रेक फ्लूईड बदलले नसेल तर काय होईल?

कालांतराने ब्रेक फ्लूईड ब्रेक होजच्या माध्यमातून आर्द्रता शोषून घेते आणि त्याचा उकळण्याचा बिंदू हळूहळू कमी होत जातो. शोषित आर्द्रता "व्हेपर लॉक" ची प्रवृत्ती वाढवते, ही एक अशी घटना आहे ज्यात ब्रेकिंग सिस्टीममध्ये उत्पन्न झालेल्या उष्णतेमुळे ब्रेक फ्लूईडमधील आर्द्रता उकळू लागते आणि बुडबुडे उत्पन्न होऊ लागतात ज्यामुळे ब्रेक नाकाम होतात. तसेच यामुळे ब्रेकिंग प्रणालीचे अंतर्गत भागांना गंज लागतो ज्यामुळे बिघाड उत्पन्न होतो. ब्रेकिंगद्वारे तयार झालेल्या उष्णतेमुळे देखील ब्रेक फ्लूएड कमकुवत बनते.
सामान्यपणे, त्याला 30000 km किंवा 2 वर्षानंतर बदलणे आवश्यक आहे. सील केलेल्या कंटेनरमधील शिफारस केलेल्या ब्रेक फ्लूईडचा (डॉट 3 / डॉट 4) वापर केल्याने सर्वोच्च सुरक्षा मानकांचे अनुपालन केले जाईल. एकदा पातळी खाली गेल्यावर ब्रेक फ्लूईड टॉप-अप करण्याची शिफारस केली जाते. डॉट 3 आणि डॉट 4 ब्रेक फ्लूएड मिक्स करू नका.
अधिक मदतीसाठी, कृपया तुमच्या नजीकच्या अधिकृत वर्कशॉपला भेट द्या.

मागील काही दिवसांपासून हँडलबार टणक झाला आहे आणि आवाजही येत आहे. कृपया या समस्येचे निराकरण कसे करावे ते मला सांगा?

रस्त्यावरुन वाहन चालवताना लागणाऱ्या धक्क्यांमुळे, वारंवार ब्रेक लावल्याने आणि पुढच्या चाकावरील लोडमुळे स्टिअरिंग(हँडलबार)लोड बिअरिंग सैल होऊ शकतात. काही स्थितीत वाहनाचे माऊंटिंग सेक्शन/बिअरिंग रेसला हानी पोहोचू शकते आणि योग्य प्रमाणात ल्युब्रिकेंट उपलब्ध न झाल्यामुळे स्टिअरिंग वळविण्यास अधिक शक्ती लागू शकते आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आवाजही होऊ शकतो.
HGP बॉल रेस किट आणि ल्युब्रिक्रंट हे त्रासमुक्त आणि दीर्घकाळ कामगिरी सुनिश्चित करतात. उत्तम ल्युब्रिकेशन आणि स्टिअरिंग उपकरणांना दीर्घकाळ चालविण्यासाठी विशेषत्वाने या आयटम्सचा वापर करण्याची शिफारस केली जाते.
दर 3000 km पूर्ण केल्यानंतर स्टिअरिंगचे परीक्षण आणि आवश्यकता भासल्यास समायोजन करण्याचे आणि दर 12,000 kms पूर्ण केल्यानंतर त्यास ल्युब्रिकेशन करण्याचा सल्ला दिला जातो.
अधिक मदतीसाठी, कृपया तुमच्या नजीकच्या अधिकृत वर्कशॉपला भेट द्या.

शॉक अब्सॉर्बरमध्ये बिघाड झाल्यास काय होईल?

शॉक अब्सॉर्बर्स हे रस्त्याच्या पृष्ठभागावरील शॉक अब्सॉर्ब करतात. त्यामुळे रायडिंग सोयीची आणि स्थिर होते. ज्यावेळी शॉक अब्सॉर्ब क्षीण होतील त्यावेळी स्टिअरिंग वरील नियंत्रण कमी होऊन बम्पीयर रायडिंग लक्षात येईल. तसेच याचा परिणाम म्हणून गतीने चाकाची झीज दिसून येईल.
HGP शिफारशित सस्पेन्शन घटकांमुळे दीर्घकाळ सर्व्हिससह विना अडथळा, स्थिर आणि सुरक्षित राईडची हमी मिळते.
प्रत्येक 30,000 kms ला शॉक अब्सॉर्बर ऑईल (फ्रंट) बदलण्याची शिफारस केली जाते.
अधिक मदतीसाठी, कृपया तुमच्या नजीकच्या अधिकृत वर्कशॉपला भेट द्या.

मी केवळ HGP बल्बचा आग्रह का धरावा?

जेन्युईन नसलेल्या बल्बची कार्यक्षमता वेगाने क्षीण होते. हे ठराविक कालावधीत प्रकाश कमी होत असल्यावरुन दिसून येते. नेहमीच्या बॅटरी ड्रेनेज होण्याच्या क्षमतेपेक्षा अधिक उर्जेचा वापर करतो. योग्य वॅटेजसह बल्ब बदलण्याची शिफारस केली जात आहे.
HGP बल्बमुळे उजळ प्रकाशाची हमी मिळते. दीर्घ आयुष्य आणि कार्यक्षम उर्जा वापरामुळे बॅटरीची योग्य चार्जिंग आणि बॅटरीच्या कार्यक्षमतेत वाढ होण्यास चालना मिळते.
अधिक मदतीसाठी, कृपया तुमच्या नजीकच्या अधिकृत वर्कशॉपला भेट द्या.

मी केवळ इंजिन ऑईलचा गमावलेला भाग नवीन इंजिन ऑईलसोबत न बदलता भरू शकतो का ?

गमावलेले इंजिन ऑईलमध्ये पुन्हा भरल्यास इंजिनमध्ये शिल्लक असलेल्या जुन्या ऑईलमध्ये नवीन ऑईल मिक्स होते. जरी इंजिनची कार्यक्षमता तात्पुरती पुर्नसंचियत केली गेली असली तरी घाण आणि काजळी इंजिनच्या कार्यक्षमतेवर परिणाम करते. शिफारशित शेड्युल आणि टॉप-अप नुसार संपूर्ण इंजिन ऑईल बदलणे उत्तम ठरेल. तसेच इंजिन ऑईल गळतीच्या कारणांचा शोध घेऊन उचित कृती केल्यास पुन्हा पुनरावृत्ती टाळता येईल.
अधिक मदतीसाठी, कृपया तुमच्या नजीकच्या अधिकृत वर्कशॉपला भेट द्या.

माझ्याकडे "गुडलाईफ कार्ड " आहे. मला HGP वर कोणते लाभ मिळतील?

गुडलाईफ इंस्टा कार्डच्या नवीन मूल्याच्या प्रस्तावानुसार सर्व गुडलाईफ मेंबर्स खालील स्लॅबनुसार पार्ट डिस्काउंटचा लाभ घेऊ शकतात:
गोल्ड मेंबर्स (0-5000 पॉईंट्स)- 2% डिस्काउंट
प्लॅटिनम मेंबर्स (5001- 50000 पॉईंट्स)- 3% डिस्काउंट
डायमंड मेंबर्स (>50000 पॉईंट्स)- 5% डिस्काउंट
नवीन पार्ट डिस्काउंटची रचना फक्त अशाच कस्टमरला वैध आहे ज्यांना नोंदणी दरम्यान इंस्टा कार्ड मिळाले आहे. जुन्या कस्टमरला HGP वर 5% डिस्काउंट मिळणे सुरूच आहे.
तुमच्या नजीकचे टच पॉईंट शोधण्यासाठी येथे क्लिक करा.

मी HGP कोठे खरेदी करू शकेल?

कस्टमरचा वाढत्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी आम्ही बदलणाऱ्या परिस्थितीनुसार कस्टमर टच-पॉईंटच्या नेटवर्कला बळकटी देत आहोत. HGP संपूर्ण भारतात 75 पेक्षा अधिक पार्ट्स वितरक, 800 अधिकृत डीलर आणि 1150 अधिकृत सर्व्हिस सेंटरच्या विस्तृत नेटवर्कद्वारे आणि जगभरातील 6000 + टच पॉईंट्सद्वारे 18 पेक्षा जास्त देशांमध्ये वितरित केले जातात. तुमचे नजीकचे टच पॉईंट शोधण्यासाठी येथे क्लिक करा.

  • फसव्या पद्धतींपासून सावध राहा
  • फसवणूक आणि घोटाळ्यांना बळी पडू नका
  • अधिक वाचा

हिरो किंवा त्यांचे डीलर कधीही तुमचा OTP, CVV, कार्ड तपशील किंवा अन्य कोणतेही डिजिटल वॉलेट तपशील शेअर करण्यास तुमच्याकडे विचारणा करीत नाही. अन्य कोणत्याही व्यक्तींसोबत ते शेअर केल्यास तुम्हाला आर्थिक नुकसान होऊ शकते.

टोल फ्री नं. : 1800 266 0018

व्हॉट्सॲपवर कनेक्ट होण्यासाठी QR कोड स्कॅन करा