हिरो मोटोकॉर्पने आपल्या मौल्यवान कस्टमरचे हित सुरक्षित ठेवण्यासाठी 'नकलीशी लढा, सुरक्षित राहा' हा उपक्रम सुरू केला. या उपक्रमांतर्गत, कंपनीने आजवर भारतातील नकली पार्ट्स आणि पॅकेजिंगच्या व्यवसायात असलेल्या उत्पादक आणि व्यापाऱ्यांवर 216 रेड आयोजित केल्या आहेत. पोलिस / EOW (आर्थिक गुन्हे विभाग) आणि तपासणी एजन्सीच्या मदतीने ही कार्यवाही केली गेली.
ही कारवाई नवी दिल्लीपासून सुरू झाली आणि त्यात विविध प्रभावित शहरांचा समावेश केला गेला. आग्रा, अहमदाबाद, अहमदनगर, अलाहाबाद, औरंगाबाद, बलरामपूर, बंगळुरू, भोपाळ, चेन्नई, चुरू, कोयंबतूर, इरोड, फरीदाबाद, फतेहाबाद, गाझियाबाद, हिसार, जिंद, कैथल, कांचीपुरम, कानपूर, कावेरीपट्टनम, कोलकाता, लुधियाना, मदुरई, मेरठ, मोगा, मुझफ्फरपूर, नाशिक, नवी दिल्ली, पटना, पुणे, रायसेन, सेलम, सांगली, तिरुपत्तूर, तुतीकोरीन, वाराणसी आणि विलुपुरम. 53 लाखांपेक्षा जास्त नकली स्पेअर पार्ट्स आणि काउंटरफीट लेबल जप्त केली गेली. हिरो ब्रँडच्या नावाचा गैरवापर करून विकल्या जाणाऱ्या नकली पार्ट्सना प्रतिबंधित करण्याची ही एक सुरुवात आहे आणि संपूर्ण देशभरातील विविध शहरांमध्ये जोरात सुरू राहील.
नकली पार्ट्सच्या उत्पादकांविरुद्ध ही मोहीम वाहनाची आणि ती राईड करणाऱ्यांच्या सुरक्षेची खात्री करेल आणि पर्यावरणाचे प्रदूषण कमी करण्यात मोठी भूमिका बजावेल. काउंटरफेट हिरो स्पेअर पार्ट विकणाऱ्या नकली व्यापाऱ्यांविरुद्ध निरंतर मोहीम राबविण्यासाठी हिरो मोटोकॉर्प वचनबद्ध आहे आणि भविष्यातही अशा व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा हेतू आहे.
मूळ हिरो जेन्युईन पार्ट्स (HPG) वर युनिक पार्ट्स आयडेंटिफिकेशन (UPI) कोड असतो. कस्टमर 9266171171 वर SMS द्वारे UPI कोड पाठवून पार्टची जेन्युईननेस कन्फर्म करू शकतो.
हिरोचे देशभरात 6000 पेक्षा अधिक कस्टमर टच पॉईंट्स आहेत, ज्यामुळे हिरो जेन्युईन पार्ट त्यांच्या कस्टमर्ससाठी उपलब्ध आहेत.
समाविष्ट केलेल्या शहरांची लिस्ट